Ctrl+G ने मराठी/इंग्रजी बदला
Type in:

रविवार 20 मे 2012
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

कोळंबी कालवण - मालवणी ष्टाइल

अमिता लिखित.. विभाग वडेसागुती

गरम मसाल्याचे कोळंबी कालवण (Malvani Recipes)

मालवणी जेवणात कोळंबीचे बरेच प्रकार चाखायला मिळू मिळतात त्यापैकीच कोळंबीची मालवणी गरम मसाल्याची कडी (आमटी) हा एक लोकप्रिय प्रकार आहे. कोळंबी घेताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असावी. लाल कोळंबी बहुतांशी वातूळ असते. कोळंबीच्या या प्रकारच्या आमटीत अगदी थोड्या प्रमाणात वापरलेले बटाटे व शेवग्याच्या शेंगा एक वेगळीच लज्जत आणतात.

साहित्य:- पाव किलो ताजी कोळंबी, २ छोटे बटाटे, ३ कांदे, १ नारळ, २ चमचे मालवणी गरम मसाला, २ शेवग्याच्या शेंगा बोटभर लांबीचे तुकडे करून, १ इंच आले, ४ पाकळ्या लसूण, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल.

कृती:- प्रथम  कोळंबी साफ करून १-२ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. आले व लसून बारीक किसून किंवा चिरून ठेवा. एक कांदा फोडणीसाठी बारीक चिरून ठेवा.  दोन कांदे उभे चिरून थोड्याश्या तेलात काहीवेळ परता व नंतर त्यात खवलेला नारळ टाकून बदामी रंग येई पर्यंत परतून घ्या. कांदा-खोबरं थोडसं थंड झाल्यावर त्यात गरम मसाला २ चमचे व हळद अर्धा चमचा टाकून मिक्सरवर वाटून घ्या. 

एका पातेल्यात थोडसं तेल चांगलं गरम करून त्यात बारीक केलेला एक कांदा परतून घ्या. कांदा किंचित लालसर होताच त्यात किसलेले आले लसूण टाकून थोडावेळ परता. कोळंबी व मिक्सर मधील वाटप एकत्र करून पातेल्यात फोडणी साठी टाका. १-२ मिनिटांनी त्यात बटाट्याचे तुकडे व शेंगा टाकुन चवी पुरते मीठ, गरज वाटल्यास गरम मसाला टाका व योग्य पाणी घालून व्यवस्थित शिजू द्या. थोड्या वेळाने घरात आमटीचा वास दरवळू लागेल तेंव्हा बटाटे व शेंगाही शिजल्याची खात्री करून ग्यास बंद करा.

भात, भाकरी, चपाती, पाव असे काहीही या आमटी सोबत खाताना फारच चविष्ठ लागते तसेच मुद्दाम आणखी एखादी भाजी करण्याची गरज पडत नाही.

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 12 पाहुणे; सदस्य नाहीत