Ctrl+G ने मराठी/इंग्रजी बदला
Type in:

रविवार 20 मे 2012
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

वाफवलेले मालवणी बांगडे

अमिता लिखित.. विभाग वडेसागुती

वाफवलेले मालवणी बांगडे (Malvani Recipes)          

फक्त वाफेवर शिजवलेल्या मालवणी बांगड्यांच्या या प्रकारात तेलाचा वापर मुळीच केला जात नाही तसेच या प्रकारे शिजवलेले मासे फ्रीज मध्ये न ठेवताही २-३ दिवस चांगले राहतात. समुद्र किनाऱ्यापासून खूपच दूर असलेल्या कोकणातील खेडेगावांमध्ये पूर्वी खूपच लोकप्रिय होती. समुद्रातील किंवा नदीतील मासेही चालतील पण यातील मुख्य घटक आहे हळदीची पाने!!! ती नसल्यास केळीची पानेही चालतील.

साहित्य:

सात ते आठ ताज्या बांगड्यांचे तुकडे (नदीचेही मासे चालतात)
मीठ चवीनुसार
हळद पाव टेबलस्पून
हिरवा मसाला 4 टेबलस्पून
आमसुले (कोकम) ५ ते ६
हळदीची पाने/केळीचे पान.

कृती:

Malvani steam cooked fish - हळदीच्या पानातली सुकी इरडाप्रथम एका भांड्यामध्ये मीठ, मसाला, हळद व आमसुले(कोकम) घालून किंचित पाणी टाकून जाडसर मिश्रण तयार करावे. त्यामध्ये माशांचे तुकडे कालवून घ्यावे आणि थोडावेळ तसेच ठेवावे म्हणजे माशांना मीठ मसाला लागेल. 

एका टोपात तळाला कुकरमध्ये टाकतो त्याप्रमाणे पाणी टाकावे. त्यावर एक/दोन इंच उंचीचे गरम भांडी उतरून ठेवायचे स्टँड (hot plate stand) किंवा लाकडाच्या बारीक पट्ट्या लावून पाण्याच्यावर सतल जागा तयार करावी. वरील जाडसर मिश्रण (माश्यांसहित) हळदीच्या/केळीच्या पानात बांधावे. झाकण ठेवून त्यावर वजन ठेवावे व मंद ग्यासवर शिजवावे. मासे शिजल्याचा वास आल्यानंतर ग्यास बंद करावा. पूर्ण थंड झाल्यावर पाने काढून मासे खावेत. दुसऱ्या दिवशीही          खाता येतात. त्यामध्ये कांदा व तेल यांचा वापर करावा लागत नाही. थोड्याश्या सरावाने ही पाककृती चांगली जमेल व सर्वाना आवडेलही.

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 10 पाहुणे; सदस्य नाहीत