रविवार 24 मे 2015
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

तवा फ्रायड कोळंबी

अमिता लिखित.. विभाग वडेसागुती

तवा फ्रायड कोळंबी (Malvani Recipes)

कोळंबी (सुंगटे) साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा तव्यावर भाजून काढायला अगदी थोडा वेळ लागतो. समुद्रापेक्षा खाडीतील काळसर रंगाची कोळंबी जास्त चवदार असते. मालवण पट्टयात कोळंबी तेलात तळून काढण्या पेक्षा तव्यावर थोड्याशा तेलात परतून काढणेच अधिक पसंत केले जाते. या प्रकारे भाजलेली  सुंगटे तव्यावर पडताच भूकेला निमंत्रण मिळते.

साहित्य:

२०-२५ मध्यम आकाराची कोळंबी - साफ केलेली
२ लसूण पाकळ्या 
पाव इंच आले (चवी नुसार)
३ टीस्पून लाल तीखट (चवी नुसार)
हळद चीमुटभर
चिंचेच पाणी
१ टीस्पून मालवणी गरम मसाला (चवी नुसार)
२ वाट्या तांदळाचे पीठ
तेल तळण्या पुरते
मीठ चवीप्रामाणे

कृती:

प्रथम कोळंबी साफ करून घ्या. मग सर्व मसाले, १ वाटी तांदळाचे पीठ, हळद, चिंचेचे पाणी व मीठ जाडसर चटणी प्रमाणे एकत्र कालउन घ्या. एका डिश मध्ये तांदळाचे कोरडे पीठ घ्या. कोलंबीच्या प्रत्येक नागाला बाहेरून चटणीचे आवरण लाऊन लावून वरून तांदळाचे कोरडे पीठ भुरभुरावे आणि  तव्यावर दीड ते दोन मिनिटे दोन्ही बाजूनी तळावे. जास्त वेळ  तळू नये अन्यथा रबरा प्रमाणे चिवटपणा व करपटपणा तो.

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 3 पाहुणे; सदस्य नाहीत