Ctrl+G ने मराठी/इंग्रजी बदला
Type in:

गुरुवार 23 फेब 2012
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

मंदार लिखित.. विभाग चर्चा

एप्रिल-मेच्या दिवसात मी दरवर्षी काहीसा nostalgic होतो. आठवतात शाळेत असतानाच्या काळातले हे दिवस. शाळेच सारं वर्ष मी या दिवसांची वाट पाहायचो. वार्षिक परिक्षा संपलेली असायची, शाळेला मस्त सुट्टी, अभ्यासाची कटकट नाही. मस्त relax दिवस असायचे. आणि त्या सुट्टीला चार चांद लागायचे हे कोकणात आजोळी जायचो त्या वेळी.

कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आम्ब्रड नामक एक साधास खेड हे माझ आजोळ. खर-तर कोकणातलं कोणातच खेड साधस नसत. आंबा, काजू, फणस, जांभळ- करवंद अशी विलक्षण संपत्ती

Print

sana लिखित.. विभाग चर्चा

     पूर्वीचा रत्नागिरी व त्यानंतर विजयदुर्ग ते रेडी व वैभववाडी पासून समुद्रकिनार्‍यापर्यंतचा हा भाग सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या जलदुर्ग "सिंधुदुर्ग" याच नावाने त्याचे नामकरण करण्यात आले. सुमारे १६० किमी. लांबीचा समुद्रकिनारा, निसर्गरम्य रेडी, शिरोडा, सागरेश्वर, वेळागर, मोचेमाड, बागायत, वायंगणी, कोंडुरा, कालवी बंदर, खवणे, निवती, भोगवे, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला, आचरा, तांबळडेग, मिठबावा, देवगड, विजयदुर्ग इत्यादी समुद्रकिनारे, वेंगुर्ला, मालवण, देवगड बंदरे तसेच वाघोटन, आचरा, कालावल, कोळम, कर्ली, मोचेमाड व आरोंदा या खाड्या याला खलाटपट्टी असे म्हटले जाते.

Print

sana लिखित.. विभाग चर्चा

कोकणातील निसर्ग अनुभवणे तसेच त्याचा लोक जीवनात होत असलेला वापर, याचा विचार केला तर निसर्गाचा इथल्या संस्कृतीवर खोलवर ठसा उमटला आहे. अर्थात प्रत्येक प्रांतात तो असतोच पण कोकणात वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीचा येथील, सणा समारंभात ते पूर्ण लोकजीवनावर परिणाम दिसतो. सहज म्हणून बाजारात गेलात तरी "गावठी" हा शब्द ऐकायला मिळेल. गावठी भाजी,  गावठी फळे,  गावठी केळी असे अनेक शब्दप्रयोग कानावर पडतील.

     आजकाल घाटावरुन आलेले व्यापारी गावठी माल घेऊन बसतात. तर गावठी बायका घाटी भाज्या घेऊन बसतात व गावठी म्हणून सांगतात हा भाग वेगळा.

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 2 पाहुणे; सदस्य नाहीत