बरेचदा विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे
सामाजिक प्रश्नोत्तरे ही ही काय भानगड आहे?
सामाजिक प्रश्नोत्तर विभागात तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता तसेच इतरांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहू शकता. प्रश्न व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त नावनोंदणी करावी लागेल. या विभागातील माहिती सर्व सदस्यांच्या सहभागाने वाढेल व सर्वानांच उपयुक्त ठरेल हि अपेक्षा!!!
छोट्या जाहिराती कुणासाठी
व्यावसाईक/विक्रेते आपल्या व्यवसायासंबंधीची जाहिरात इथे योग्यत्या विभागात लिहून प्रसिद्ध करू शकतात.
जाहिरात देण्यापूर्वी कृपया त्य संबंधीची नियमावली वाचावी.
व्यावसाईक/विक्रेते आपल्या व्यवसायासंबंधीची जाहिरात इथे योग्यत्या विभागात लिहून प्रसिद्ध करू शकतात.
जाहिरात देण्यापूर्वी कृपया त्या संबंधीची नियमावली वाचावी.
इंटरनेटवर आपण दिलेली छोटी जाहिरात अपेक्षेपेक्षाही मोठा परिणाम करू शकते.
- इंटरनेट द्वारे मालवणी.कॉम चा सर्व जगभरात वाचक वर्ग आहे.
- मालवणी.कॉम वरील तुमच्या जाहिराती खालचे बुकमार्क्स वापरा व अगदी सहज मराठी मध्ये तुमची जाहिरात फेसबुक, ट्विटर, गुगल +१ तसेच लिंक्डइन पर्यंत पोचावा.
- बुकमार्क्सचा वापर केल्यास इंटरनेट वर तुमची जाहिरात अधिकाधिक ठिकाणी विनाशुल्क दिसू लागेल व तुमचा वाचक वर्ग वाढतच जाईल. अशी प्रसिद्धी वर्तमानपत्र, टीव्ही किंवा अन्य छापील जाहिरातींद्वारे अशक्य आहे.
- दररोज नवीन वाचकवर्ग स्वत:च तुमच्या जाहिराती पर्यंत पोचतो त्यामुळे तो संपर्क करण्याची श्यक्यता खूपच जास्त असते.
जाहिरात देताना योग्य विभाग दिसत नसल्यास कृपया संपर्क इमेलने कळवा.
कसं करावं मालवणी.कॉम वर लेखन ?
काँप्यूटर व इंटरनेट वापरण्याची जुजबी माहिती असल्यास तुम्ही स्वतःचं लिखाण इथे स्वतःच टाइप करुन प्रसिद्ध करु शकता.
अपेक्षा येवढीच आहे की आपलं लेखन शक्यतो कोकण या विषयाशी संबंधित असावं.
नाव नोंदणी कशी करावी?
१. या साईटच्या मुखपृष्ठावर उजवीकडे दिसणाऱ्या "member login" वर क्लिक करून उघडणाऱ्या विंडोत "नवीन खाते उघडा" या लिंक वर क्लिक करा.
पुढे येणाऱ्या पानावर एक फॉर्म दिसेल . त्यात आवश्यक ती माहिती भरून "Register" या लिंकवर क्लिक करा.
नाव नोंदणी पूर्ण होई पर्यंत आवश्यक त्या सर्व सुचना आपोआपच दिसू लागतील त्यांचे पालन करा.
२.जर गुगल वर तुमचे इमेल खाते असेल तर इथे वेगळी नाव नोंदणी करण्याची गरज नाही. तुमचा पूर्ण "गुगल इमेल पत्ता" व त्या खात्याचा पासवर्ड वापरूनही लॉगीन करता येईल. इथे तुमचे खाते आपोआपच तयार केले जाईल.
३.जर तुमचे फेसबुक वर खाते असेल तर इथे वेगळी नाव नोंदणी करण्याची गरज नाही. वर उजवीकडे दिसणाऱ्या "F-LOGIN" वर क्लिक करून तुमच्या फेसबुक वर लॉगीन करा. इथे तुमचे खाते आपोआपच तयार केले जाईल. --- (सध्या उपलब्ध नाही.)
४. एकदा खाते तयार झाले की पुढच्या वेळी तुम्ही उजवीकडे दिसणाऱ्या "member login" वर क्लिक करून साईटवर लॉगीन करू शकता व त्यासाठी तुम्ही "युजरनेम" किंवा "पूर्ण इमेल पत्ता" यापैकी काहीही वापरू शकता.
कुठून सुरुवात करावी?
या साइटवर कोणत्याही प्रकारचं लेखन करण्यासाठी प्रथम नावनोंदणी करावी.
नाव नोंदणी पूर्ण झाल्यावर "संपर्क" मेन्यूवर क्लिक करा व येणाऱ्या फॉर्म लेखन करण्याची इच्छा आहे असं लिहून पाठवा.
यानंतर प्रशासक तुमचे सदस्यत्व "लेखक" या प्रकारात नोंदवतील व तुम्हाला तसे कळवतील. त्या नंतर तुम्ही इथे लेखन करू शकाल.
लॉग इन केल्यावर डाव्या बाजूला "सदस्य विभाग" मध्ये "लेखन करा" वर क्लिक करून तुम्ही या साइटवरील विविध सदरांसाठी लेखन करू शकता.
"लेखन करा" वर क्लिक केल्यावर संपादन प्रणाली दिसू लागेल. इथे सर्वात मोठ्या चौकोनात आपले लिखाण करावे.
वरच्या बाजूला भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेले आहेत तिथून योग्यतो पर्याय निवडून लेखन सुरू करावे.
कसे करावे देवनागरी टंकलेखन?
वर सांगितल्याप्रमाणे योग्य ती भाषा निवडून योग्य त्या रकान्यात क्लिक करा व लिहायला सुरुवात करा.
या साईटवर मराठी/इंग्रजी लिहिण्यासाठी Google Transliteration चा वापर केलेला आहे.
सूचना:- शब्द मराठीत दिसण्यासाठी लिहून ''स्पेस बार'' दाबा, जसे "मराठी" हा शब्द लिहिण्यासाठी marathi अक्षरे लिहून ''स्पेस बार'' दाबा. मराठी/इंग्रजी भाषा बदलासाठी Ctrl+G वापरा.
अधिक माहितीसाठी व प्रक्टिससाठी तुम्ही Google Transliteration ला भेट देऊ शकता.
कायम स्वरूपी उपाय:- http://www.google.com/ime/transliteration/ ला भेट द्या. Google Transliteration Input Method (IME) आपल्या कॉम्प्यूटर वर इन्स्टाल करून तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर/प्रोग्राम मध्ये मराठीत लिहू शकता.
काय करावे लेख्नन एकाच बैठकीत पूर्ण न झाल्यास?
बहुतेक वेळा एकाच बैठकीत लेखन पूर्ण करणे शक्य होत नाही म्हणून केलेले लेखन साइटवरच (online) सेव्ह करण्याची व नंतर पुन्हा जमेल तेव्हां पुढे चालू करण्याची सोय केलेली आहे.
नवीन लेखन पहिल्या वेळी सेव्ह(online) करताना प्रथमः-
वरच्या बाजूला शीर्षकाच्या रकान्यात शीर्षक व तळाला लेखकाचे टोपण नाव लिहा.
नंतर शाखा निवडा व त्याखाली असणारी उपशाखा निवडा म्हणजे प्रसिद्धीनंतर लेखन योग्य त्या विभागात दिसेल.
प्रकाशित करण्याची अपेक्षित तारीख त्या रकान्याच्या शेजारी असणार्या कॅलेडरवर क्लिक करुन निवडा.
लेखन मर्यादित काळापुरतेच प्रसिद्ध करवयाचे असल्यास, प्रसिद्धी बंद करण्याची तारीख निवडा.
हे सर्व केल्यानंतरच वर शीर्षक रकान्याच्या शेजारी असणर्या सेव्ह बटणावर क्लिक करा.
या नंतर आपले लेखन दर १५-२० मिनिटानीं सेव्ह करणे योग्य होईल व त्यासाठी दरवेळी फक्त सेव्ह बटणावर क्लिक करा.
अर्धवट राहिलेले लेखन पुन्हा सुरू करायचे आहे?
लॉग इन केल्यावर डाव्या बाजूला "सदस्य विभाग" मध्ये "माझे लेखन" वर क्लिक केल्यास तुमच्या अपूर्ण/अप्रकाशित लेखनाची यादी दिसेल.
योग्य त्या शीर्षकाच्या उजव्याबाजूच्या रकान्यातील एडिट बटणावर क्लिक केल्यास संपादक प्रणाली सुरु होईल व अर्धवट राहिलेले लेखन पुन्हा सुरू करता येईल.
लेखन प्रसिद्धीसाठी कसे सुपूर्त करावे?
नवीन लेखन पहिल्या वेळी सेव्ह करताना तुम्ही निवडलेल्या प्रसिद्धीच्या तारखेलाच लेखन प्रसिद्ध करण्याचा संचालकांचा प्रयत्न राहिल.
मध्यंतरीच्या काळात वाटल्यास तुम्ही प्रसिद्धीची तारीख बदलू शकता.
या साइटवर वाचकानां आपल्या "प्रतिक्रिया" नोंदवता येतील का?
एखाद्या लिखाणाच्या तळाशी असणार्या Facebook व इतर लिंक्स वर क्लिक करुन आपण आपली प्रतिक्रिया नोंदऊ शकता.
इतरांनी लिहिलेल्या प्रतिक्रियेला आपले गुण देऊन सहमती(+) वा असहमती(-) दर्शऊ शकता.
तसेच इथल्या सुविधांचा गैरवापर(!) होत आहे असे आढळल्यास प्रशासकाला "संपर्क" फॉर्म वरून कळऊ शकता.











