रविवार 24 मे 2015
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

मालवणी म्हणी

सना लिखित.. विभाग गजाली

अर्थ पहायला त्या ओळीवर माऊस न्या

आकाडता बापडा, सात माझी कापडा
आयत्यार कोयत्ये
आळशी उटाक आनी शिमरा शिंकाक
इतभर तौसा नी हातभर बी
कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी
कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी
खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच
खांद्यार बसयलो तर कानात मुतता

खुळा भांडता वझरा वांगडा
खेकट्याक मेकटा
गजालीन खाल्लो घोव
गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी?
गावता फुकट भाकरी तर कित्याक करु चाकरी
गावला तेचा फावला
गावात लगीन नी कुत्र्याक बोवाळ
चुकला माकला ढॉर धामपुरच्या तळ्यात
तुका नको माका नको घाल कुत्र्याक
दिसला मडा, इला रडा
देणगेसारख्या घोरीप
नदी आधी व्हाणो, कढलल्यो बर्‍यो
नाय देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे
नालकार रडता म्हणान त्यालकार रडता
पादर्‍याक निमीत पावट्याचा
पानयात हगलला काय दडान र्‍हवाचा नाय
पावळेचा पाणी पावळेक जाताला
पिकला पान घळतलाच
पोरांच्या मळणेक बी नाय भात
भोपळन बाय पसारली नी पाटचे गुण इसारली
मिठाक लावा नी माका खावा
मेल्ल्या म्हशीक पाच शेर दूध
मोव थय खोव
येरे दिसा नी भररे पोटा
येवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात
लिना लिना नी भिकार चिन्हा
वसाड गावात एरंड बळी
वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव
सरकारी काम, तीन म्हयने थांब
सरड्याची धाव वयपुरती
सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा
हयरातय नाय नी माशातय नाय
हळ्कुंडाच्या पदरात शेळ्कुंड
हात पाय र्‍हवले, काय करु बायले
हो गे सुने घरासारखी
देणा नाय घेणा आणि कंदिल लावन येणा
करुन गेलो गाव आणि .... चा नाव
काप गेला भोका रवली
कावळो बसाक फांदी मोडाक
मोठ्या लोकंची वरात आणि हगाक सुद्धा परात
हगणार्‍याक नाय तरी बघणार्‍याक होई लाज
कापाड न्हेला बायन आणि चींधी नेली गायन
गावकारची सुन काय पादत नाय?
कपाळार मुकुट आणि खालसुन नागडो
कोंबो झाकलॉ म्हणान उजवाडाचा रव्हत नाय
दोडकार्‍याचा कपाळात तिनच गुंडे
केला तुका - झाला माका
कोको मिटाक जाता मगे पावस येता
करुक गेलं गणपती आणि झाला केडला
कशात काय आणि फटक्यात पाय
आपला ठेवा झाकान आणि बघा दुसऱ्याचा वाकान
दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती
आवस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक
करून करून भागलो आणि देव पूजेक बसलो
जेच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप
जेच्या खिशात आणो तो म्हणता मीच शाणो
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय
फूडचा ढोर चाल्ताला तसा पाटला
भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा
आपली मोरी आणि मुताक चोरी?
हाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना
गायरेतले किडे काय गायरेतच रवनत नाय
आवस सोसता आणि बापूस पोसता
आंधळा दळता आणि कुत्रा खाता
अंधारात केला पण उजेडात इला
कायच नाय कळाक - बोको गेलो म्हाळाक
एक कानार पगडी आणि घराक बायल उघडी
येळार येळ - शीगम्याक खेळ
घरासारखो गुण, सासू तशी सून
चल चल फुडे तीन तीन वडे
चव नाय रव धनगरा पोटभर जेव
चुलीतला लाकूड चुलीतच जळाक होया
शेजारणीचा रस्सा आणि पोळयेचा काढून बसा
उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक
मडकेत कडी पाटी जीव ओढी
घरणी बरोबर वाकडा ता खायत चुलीतली लकडा
पडलो तरी नाक वर
एक मासो आणि खंडी भर रस्सो
खिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी
धाक नाय दारारो, फुकटचो नगारो
तरण्याक लागली कळ आणि म्हाताऱ्याक इला बळ
वसावसा खान आणि मसणात जाणा
दुकान नाय उघडला, तो इलो उधारेक
नावाजललो गुरव देवळात हगलो
राती राजा आणि सकाळी कपाळार बोजा
डाळ भात लोणचा कोण नाय कोणचा
देव गेल्लो हगाक आणि ह्यो गेल्लो अक्कल मागाक
तुमचा तुमका आणि खटपट आमका?
गाढवा गुळ हगती तर घोरपी भीक कित्या मागती?
सुने आधी खावचा, लेकी आधी लेवचा
वरये दितय तुका गावकार म्हण माका
शेजारी पाजारी मड्याक आणि पावणे सोयरे वड्याक
बघून बघून आंगण्याची वाडी
अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो
कोणाची जळताहा दाडी आणि तेच्यार कोण पेतयता इडी
बारशाक वारशी नसाय आणी अवळात बसलो देसाय
पानवेलीच्या धर्मान शेगलाक पाणी

Malvani Language - Malvani Mhani - did you like them?

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 4 पाहुणे; सदस्य नाहीत