कोकणात लोकसंख्या आणि गावं तशी लहानच. घाटावरच्या सारखी लाख लाख वस्तीची शहरे इथे नाहीत. त्यात करुन रत्नागिरी सोडले तर, म्हण्यासारखे मोठे शहर नाहीच हल्ली चिपळूण सारखी तसेच हायवेवरची गावे वाढत असली तरी पुर्वांपार आठवडा बाजार हा गावा गावातून पंचक्रोशीत आज ही भरला जातो.
प्रत्येक तालुक्यात पंचक्रोशीत एका गावात पुर्वांपार आठवडा बाजाराचा दिवस ठरलेला आहे. कणकवली -मंगळवार, मालवण -सोमवार, कुडाळ -बुधवार, कसाल -गुरुवार. असे बाजाराचे दिवस जवळपासच्या गावातील शेतकर्याना व विक्रेत्याना पाठ झालेले असतात. काही गावात आठवडाबाजार काही ठराविक वस्तूंसाठी पण प्रसिध्द असतात. काळाप्रमाणे बाजार बदलले, वस्तू बदलल्या पण वातवरण तसेच आहे. या बाजारांचे वैशिष्ट्य म्हणजे सिझनप्रमाणे बाजारातल्या वस्तू पण बदलतात. प्रत्येक बाजारात चहा, भजी व वडा पावची हॉटेल मात्रे असणारच.











