पण लायनच खय जुळनाशी झाली
हयसून गेलय थयसून गेलय
पण कोणाचाच कोण दिसना
हेचा बघितलय आन् तेचा बघितलय
पण कोणाचाच काय पटना
भोवर्यासारखो गरगरलंय
पण भूरळ काय ती पडना
खिसो पक्को रितो झालो
पण फिरना काय सूटना
लग्ना कितकिव काय होयनत
पण होवये काय बदलत नाय
छोकरी काय नोकरी काय
येरझारे काय सूटनत नाय
उकळीकच जर जमीन नाय
तर हातात नांगर धरून उपयोग काय?
लेखणीतली शाई उकिर्ड्यावर पण सांडली
डोक्या पाजळून तरी करतलंस काय?
धाक-धाक आणि राक-राक
मायला इतकिच काय जिंदगानी
पण असो-तसो आयकाचय नाय
रक्तात भिंदारता जवानीची लाली
पण ह्या बाकी काय खोटा नाय
ग्रामपंचायत गेली आन् नगरपंचायत ईली
हातात मोबाइल ईलो खरो
पण लायनच खय जुळनाशी झाली
-अमर पवार











