तुका बघलय थयसून
जीव खेच्यातच रमाना
तुझ्या डोळ्यात टक लावचा
माझ्यात इतक्या धाडस नाय
तिया माझाच व्हवचा
मन सारख्या कोकालता
दोपार तिपार जयथय
तुझ्याच पाठ्सून भटकता
पण त्या दिवशी तिया माका
त्वांड बघ म्हणान हिनयलय
थयसून तुझ्या तोंडार मिया
शीरा मारुचा ठरलय
आता वगीच कधी झुराचा
खोट्या आशेर रव्हाचा
मिळात ताच आपला म्हणान
झेपात तितक्या जगाचा...
_ महेंद्र मातोंडकर, वेंगुर्ले.











