Ctrl+G ने मराठी/इंग्रजी बदला
Type in:

रविवार 20 मे 2012
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

देव

अमर लिखित.. विभाग काव्य

देव

माणसांच्या खु-याड्यात
देव नवा ठाकला आहे
मनामनात आरती त्याची
पैसा त्याचं नाव आहे ||धॄ||

पैशाशिवाय काही चालत नाही...
नेहमीच  ऐकावं लागतं
पैशासाठी कधी स्वतःलाही
भर बाजारात विकावं लागतं
आज माणसांच्या बाजारात देवालाही भाव आहे||

आज नाती-गोती सगळीच
क्षणासाठीच असतात
पैसा नसला गाठीला की
ती क्षणभरातही फिरतात
आज पैसा बघून लग्नाची जीवनगाठही जोडत आहे||

पैसा नसतो सगळं म्हणून
रडतानाही पाहिलं
पैसा नसता जीवंतपणी
सडतानाही पाहिलं
आज चलनाविना दुबळे आम्ही जीवनही गहाण आहे||

ठाऊक आहे तुला-मला
भरपूर काही अनमोल आहे
हृदयाचा टाहो फुटला की
सर्वकाही फोल आहे
आज हृदय पिचून बघितलं सरणालाही किंमत आहे||

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 6 पाहुणे; सदस्य नाहीत