मालवणी डाळभात (Malvani Recipes)
सिंधुदुर्गाला प्राप्त असलेला समुद्र किनारा यामुळे येथील मुख्य अन्न भात आणि मासे (माश्याचे सार) सोबत फ्राय केलेला मासा. समुद्र्किनारा म्हट्लं की मोठ्मोठ्या नारळाच्या (माडाच्या) बागा. सिंधुदुर्गातही त्याचप्र्माणे आहे येथे जेवणातील कोणत्याही पदार्थात ओल्या नारळाचे खोबरे वापरल्याशिवाय ते जेवण रुचकर नाही असे समजले जाते. येथे भाताचे पीक घेतले जाते याव्यतीरीक्त येथील जमिनी चांगले पीक देत नाहीत. मुबलक प्रमाणात मिळ्णारे मासे व तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथील अन्न भात व मासे.
डाळ
साहीत्य - १ वाटी तुरडाळ, ४-५ हीरव्या मिरच्या, १ वाटी ओल्या नारळाचा खवलेलं खोबरे, हळद, १ टोम्याटो कीवा आमसुले/चिंच, मिठ, फोडणीसाठी हींग, मोहरी, जीरे, तेल, असल्यास कढीपत्ता
कृती - प्रथम तुरडाळ ओली मिरची, टोम्याटो कुकरमधुन शिजवुन घ्यावेत. नंतर हळद व ओले खोबरे मिक्सर म्ध्ये बारीक करुन घ्यावे. एका पतेल्या मध्ये फोड्णीसाठी तेल टाकुन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे, कढीपत्ता, मोहरी, हींग घालावेत, फोडणि तडतड्ल्यावर त्यात बारीक केलेले खोबरे शिजवलेली डाळ ओतावी. डाळिला उकळी आल्यावर दोन ते तीन मिनीटांनी ग्यास बंद करावा. डाळ तायार झाली.
ही डाळ भाताबरोबर खाण्यास घावी डाळव भात त्याबरोबर एखादि तीख्ट भाजी कीवा उसळ लोणचे पापड घ्यावेत.
भात
साहीत्य -
दोन वाट्या तांदुळ, चार वाट्या पाणी
कृती-
तांदुळ साफ करुन धुवुन घ्यावेत नंतर एका पातेल्यात पाणि व तांदुळ घालुन गॅस वर ठेवावे उकळि आल्यावर गॅस थोडा कमी करावा थोड्या वेळात तांदुळ पाण्याबरोबर येतील, तांदुळ अर्धे शिजले्ले असतील थोड्या वेळात भात शिजलेला असेल आता भातात किंचीत पाणि असेल आता भात मुरण्यासाठी ठेवावा मुरण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे थोड्या वेळाने झाकन काढुन भातावर कावीलता मारावा. दब दब असा आवाज आल्यास भात तयार झाला.
सोलकढी
साहीत्य -
२ वाट्या पाणी, ४ ते ५ कोकम, ४ लसुन पाकळ्या, १ इंच आले, २ हीरव्या मिरच्या, २ वाट्या ओल्यानारळाचा चव (खववलेले खोबरे)चवी पुरते मिठ, बारीक चिरलेली कोथींबीर.
कृती -
प्रथम कोकम कोमट पाण्यात भिजत घालावीत, नंतर खववलेले नारळाचे खोबरे लसुन ओली मिरचि, आले हे सर्व मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावे, त्यानंतर या वाटपामध्ये थोडे पाणी मिसळुन हे मिश्रण गाळुन घ्यावे यामध्ये भिजलेली कोकम पाण्यासहीत घालावे. मिठ व कींचीत साखर घालावी. ही सोलकढी भाताबरोबर खावयाची झाल्यास बरोबर तळलेले मासे, कीवा मटण घ्यावे.











