सोलकडी
Malvani Solkadhi (Malvani Recipes)
कोकम (आमसूल/सोला) व नारळाचा रस यापासून बनवलेली चवदार, ताजतवानं करणारी पाचक कडी. कोकणात बहुतांशी सर्व घरात आणि कोकणी/मालवणी हॉटेलात सुद्धा दुपारच्या जेवणात सोलकडी हमखास मिळते. जेवणात शेवटचा भात सोलकडी ने जेवण्याची पद्धत आहे.
साहित्य:
१ खवलेला ताजा नारळ
७-८ कोकमं
१ मिर्ची बारीक तुकडे केलेली
१ इंच आले - बारीक तुकडे करून किंवा किसून घ्या
१ टीस्पून कोथिंबीर - बारीक तुकडे करून
४ लसून पाकळ्या
थोडीशी मिरपूड
थोडीशी जीरा पूड
चवी पुरतं मीठ
कृती:
एका पातेल्यात खोबऱ्याचा रस हाताने पिळून घ्या. खोबऱ्याच्या चोथ्यात अर्धा कप पाणी घालून पुन्हा एकदा पिळून घ्या. त्यात बाकीच्या सर्व वस्तू:- कोकमं, मिर्ची, आले, कोथिंबीर, लसून, एक चिमूट मीरपूड, एक चिमूट जिरापूड आणि चवी पुरतं मीठ टाकून मिश्रण चांगलं ढवळा आणि तासभर तसच ठेवा. सोलकडी तयार.











