सोमवार 25 मे 2015
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default style
  • blue style
  • green style
  • red style
  • orange style
Print

मालवणी मसाला

sumatirane लिखित.. विभाग वडेसागुती

मालवणी गरम मसाला Malvani Masala Recipe in English Malvani Garam Masala (Malvani Recipes)

पुढे सर्वसाधारण मालवणी मसाल्याची २ किलोची कृती देत आहे. हा मसाला शाकाहारी/मांसाहारी जेवणासाठी चालतो. मासला वापरायला सुरुवात केल्यावर तुम्हाला वर्षभरासाठी किती लागेल याची कल्पना येईल. काही गृहिणींच्या साहित्यात व कृतीत फरक असू शकतो.

साहित्य:

१ किलो सुकी लाल मिरची (Dried Red Chillies)- बेडगी मिरची चवदार असते तर कोकणातली मिरची फारच तिखट असते.
अर्धा किलो धणे (Coriander Seeds)
२० ग्राम लवंगा (Cloves)
५० ग्राम काळी मीरी (black Peppercorns) 
१०० ग्राम बडीशेप (Fennel Seeds)
२५ ग्राम जिरे (Cumin Seeds)
२५ ग्राम शाही जिरे (Black Cumin Seeds)
२० ग्राम काळी वेलची (Black Brown Cardamom)
५० ग्राम दालचीनी (Cinnamon)
५० ग्राम दगडफुल (Stone flower)
५० ग्राम नागकेशर (Nagkeshar)
२५ ग्राम काळी मोहरी (Black Mustard Seeds)
२५ ग्राम हळकुंड (Dried Turmeric Root)
१० ग्राम बदलफुल (Star Anise)
२५ ग्राम खड्याचा हिंग (Whole Asafoetida Stones)
२ जायफळ (Nutmeg)

कृती:

प्रथम हळकुंड, जायफळ व हिंग यांचे बारीक तुकडे करा. धणे,जायफळ व लाल मिरची सोडून बाकीच्या सर्व वस्तू स्वतंत्रपणे थोड्याश्या तेलात परतून घ्या. सर्वात शेवटी लाल मिरची व धणे परतून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून (दळून) घ्या म्हणजे मसाला तयार होईल. हवाबंद डब्यात ठेवल्यास हा मसाला चांगलं वर्षभर टिकतो.

ऑनलाईन आहेत

आत्ता ऑनलाईन: 3 पाहुणे; सदस्य नाहीत