कोकणी...भात बोकणी...कोकणी भाऊ...मासे खाऊ...कोकणची प्रिति...वडे सागुती
आपण तसे काही खादाड नाही पण चवदार आणि साग्रसंगीत खाण्यासाठीच जन्म घेतल्याचा ठाम विश्वास असणारे नक्कीच आहोत. वाढवाळाच्या वडे-मटणा पासून लग्नाच्या माटवातील फणसाच्या भाजीपर्यंत सर्वच कसे जीभेला वरदान मिळाल्यासारखे.
इथे डाळभात सदरात शाकाहारी तर वडेसागुती मधे मांसाहरी पाककला (अर्थात कोकणीच) आणि बाकी खाण्याच्या चर्चेसाठी समर्पयामी.....
- डाळभात (1)
-
वडेसागुती
(9)

मालवणी मांसाहारी पदार्थात कोंबडी वडे (वडे-सागुती/Kombadi Vade), मोरी मटण (Mori Mutton), तळलेले मासे (Fish Fry), माशाची कडी (कालवण/Fish Curry), कुर्लेचा सांबारा (Kurli Masala), कालवांचा सांबारा (Kalva Masala) हे लोकप्रिय होत जाणारे पदार्थ आहेत. तर कवड्याचा मटण, साळींदराचा मटण, सशाचा मटण, रान डुकराचा मटण हे अगदीच दुर्मिळ होत चाललेले आहेत. पूर्वजांनी पूर्वीच खाऊन संपवले. सॉरी.









