! देव आरेश्वर !
मु.पो.आरे,तालुका देवगड,जिल्हा सिंदुधुर्ग येथील प्रसिद्ध मंदीर आहे. हे मंदीर आरे गावची शान आहे.हे मंदीर आरेश्वर वाडीत वसलेले आहे. ह्या मंदीराच्या बाजुचा परिसर पहिल्या नंतर मन भरुन येते.कोकणात असणा-या सर्व स्थानिक मंदीराप्रमाणेच हे हि एक जाग्रुत देवस्थान आहे.ह्या मंदीराच्या बाजुला चार लहान मंदीरे आहेत.त्यपैकी एक गांगोदेवतेचं मंदीर आहे. ह्या मंदीराच्या आजुबाजुच्या परीसरात अनेक देवतांच्या लहान लहान मुर्त्या पुरलेल्या आहेत.खासकरुन ह्या मुर्त्या फार प्राचीन आहेत.बाजुला एक पिंपळाचं झाड आहे.त्याच्या भोवताली चिरेबंदी पार बंधलेला आहे.
ह्या मंदीराच्या आतमध्ये ९-१० पाय-या चढल्यावार ५ पावलांवर नंदी ची मुर्ती आहे. मंदीर आतमधुन पुर्णपने खुले आहे.त्यानंतर समोर पाहील्यावर श्री देव आरेश्वराचे दर्शन होते.ह्य मंदीराच्या गाभरा खुपचं देखणा आहे.गाभ-यात शंभु महादेवाची पिंडी आहे.मंदीराच्या आतुन ॐ नमः शिवाय चा नाद घुमत आसतो.मंदीरात गेल्यानंतर आतिल वातवरण एकदम शांत वाटते.
सर्व गावचे सार्वजनिक कार्यक्रम या मंदीरातच केले जातात.होळी,दसरा,सप्ताह,त्रिपुरारी पौर्णिमा या सर्व कर्यक्रमांसाठी गावातील सर्व भाविक येथे मोठ्या प्रमणात गर्दी करतात.या सर्व कर्यक्रमांचा आरंभ आरे गावचे वसाधिकार असलेले ग्रामस्थ श्री.रामदास कदम यांच्या हास्ते केला जातो.











