• Decrease font size
  • Default font size
  • Increase font size
गांववाल्यांका नमस्कार पीडीएफ़ छपाई करा ई-मेल
लेखन Administrator   
रविवार, 15 नोव्हेंबर 2009 00:00

     बा देवा गांगेश्वरा, गाव देवी भगवती, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या सातेरी वेतोबाक आणि "समस्त सुरवर गणानां" तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्या, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्‍या सर्वानांच माझ्या वेबसायटीर येवचा आवाहन करतय आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणान कोकणाविषयी थोडाफार लीवन malvani.com ची राखण रखवाली करूची विनंती करतय. म्हणा - होय महाराजा!!!
 
    या साईटचा हेतू तुम्हाला कळला असेलच. प्रत्येक माणसाला जशी विचार करण्याची शक्ति (बरी जाव वायट जाव) दिलेली आहे (मी नाही, ^^ त्याने) तसेच थोडफार लिहिण्याचीसुद्दा शक्ति (पुन्हा बजावाजा) दिलेली असावी, फक्त आपण ती ओळखून त्याचा वापर करण्याची गरज असते. आता माझंच पहा, साईटचा विषय "कोकण", साईटचं नाव "मालवणी", मी लिहितोय मरठीत(??) आणि तरी सुद्धा तुम्ही हे वाचताय ना!!! तर मग लिहा, तुम्हीपण लिहा, वाचक भेटतीलच!!! "one can not be a writer all the time so one can not be a reader all the time" (कुणी नाही, मीच म्हटंलय ते), थोडक्यात, नेहमी लिहिणारे सुद्धा वाचतात तर सतत वाचणारे थोडं लिहू शकत नहीत?? कोणी सांगुचा कोणाच्या आगांत कोणाचो संचार जायत, I mean वपु-पुल-बाभ-प्रके वगैरे वगैरे. As long as it is nigadit with kokan, it will be published here.

     R U inspired now? इथे लेखन कसं करावं याची तांत्रिक माहिती क.का.कि.की... या सदरात पहा.

शेवटचा बदल सोमवार, 28 जुन 2010 11:06 रोजी
 
बारकोमामा पीडीएफ़ छपाई करा ई-मेल
लेखन sana   
मंगळवार, 29 डिसेंबर 2009 14:56

बारको तथा बाळकृष्ण किर्लोस्कर, उंची ५ फुट, कुरळे केस, मोठे डोळे, बारीक देहयष्टी, भेदक नजर, शि़क्षण १२वी नापास, कायम  इनशर्ट. एकंदरीत ध्यानच. गावात, घरची माणसे त्यात करुन लहान  मुले समोर "बाळाकाका" म्हणतात. अपरोक्ष व संपुर्ण पंचक्रोशीत "बारको" म्हणूनच प्रसिध्द.

आयुषात बारक्याने लग्न व दोन मुले, मोठी मुलगी व एक मुलगा ही दोन चांगली कार्ये केली. काम म्हणाल तर अनेक प्रकाचे उपद्व्याप केले. तुम्ही त्याला काम म्हणा अगर काहीही म्हणा, शेतीपासून चारहात लांब.  तरी पण बारक्याची महती पंचक्रोशीत घराघरात. बारको म्हटल्यावर सर्वाना आठवणारी मुर्ती.

शेवटचा बदल बुधवार, 10 फ़ेब्रुवारी 2010 20:22 रोजी
 
सिंधुदुर्ग आणि पर्यटन पीडीएफ़ छपाई करा ई-मेल
लेखन sana   
मंगळवार, 29 डिसेंबर 2009 14:05

मला आठवतं लहान असताना आम्ही कुडाळला होतो. आम्ही विहीरीकडे उभे राहून गोव्याच्या रंगीत गाड्या बघायचो. फिरणारी माणसं वेगळी. आम्ही फक्त वर्षातून एकदा मामाकडे आणि गावाला जायचो.

आता काळ बदलला. फिरणारी माणसे ऐवजी पर्यटन हा प्रकार आला. खुप लांब देशात फिरण्यापेक्षा आपल्या सभोवती जिल्ह्या मध्येच अनेक स्थळं अशी पाहण्यासारखी आहेत, की ती पाहायला आता लांबून लोक येतात. कोकण रेल्वे, प्रायव्हेट गाड्या यामुळे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. काही सुविधा अजून व्हायच्या आहेत.

शेवटचा बदल बुधवार, 10 फ़ेब्रुवारी 2010 20:26 रोजी
 
जात्रा पीडीएफ़ छपाई करा ई-मेल
लेखन नामदेव   
शुक्रवार, 01 जानेवारी 2010 10:21

आता भरनत नाय जात्रा पयल्यासारखे...
दिवस्याढवळ्या लॉक पाया पडान जातत...
रीतभात नी वरगणीसाठी जात्रांची नाटका...
टीवी वयलेच कार्यक्रम टायमपास करतत.
तेवा ढोलांच्या कुडपार जात्रांच रगतात भरा...
गावाघरात मनापानात जात्राच जात्राच भरा...
साफसफाय देवळांची माटवबिटव घालीत...
पोशाखांनी दागिन्यांनी दॅवसुदा नटत
ढॉलसुदा गावकार तडक्यान बडैत...
लांबचे दुकानदार जागेसाठी झटत...
देवापुढे रास पडा तांदळानाळरांची...
वळेसार, उदबत्तींका जागाच उरा नाय...
नावसानी न्हावनानी मानकरी थकत...
नाटक उब्या रवासर जेवक सवड नाय...
तातांसाभर पालखी फिरा देवळाभोवतीनी
बनाटे नी भजना अवसार घुमत...
गणपती, संकासुर, बिलीमारो गेलो काय...
राजासाठी लॉका अगदी गपगार रवत...

शेवटचा बदल बुधवार, 10 फ़ेब्रुवारी 2010 20:31 रोजी
 
गेले ते दिन गेले पीडीएफ़ छपाई करा ई-मेल
लेखन sana   
मंगळवार, 29 डिसेंबर 2009 14:02

कोल्हापूरहून घाट उतरल्यावर सर्वात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे घाटातून दिसणारे गर्द हिरव्या वनराईतील कोकण व त्यामधील वळणावळणाचे रस्ते आणि तिथली भाषा. फोंडा, गगनबावडा या भागावार कोल्हापूरी वळणाची थोडी छाप जाणवते. तर दोडामार्ग, बांदा यावर गोव्याची छाप दिसते. खारेपाटण  परिसरात राजापूरमधील बोलीभषेची छाप जाणवते. असे असले तरी सिंधुदुर्गातही मालवणी भाषेची वळणे थोड्या थोड्या अंतराने बदलतात. नोकरीच्या निमित्ताने जिल्ह्यात बदलीच्या गावी आम्ही तसे फिरलो, तशी तेथील वेगवेगळी भाषा आमच्या तोंडी बसत गेली.

शेवटचा बदल बुधवार, 10 फ़ेब्रुवारी 2010 20:24 रोजी
 
सिंधुदुर्ग जिल्हा पीडीएफ़ छपाई करा ई-मेल
लेखन sana   
मंगळवार, 29 डिसेंबर 2009 14:06

     पूर्वीचा रत्नागिरी व त्यानंतर विजयदुर्ग ते रेडी व वैभववाडी पासून समुद्रकिनार्‍यापर्यंतचा हा भाग सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या जलदुर्ग "सिंधुदुर्ग" याच नावाने त्याचे नामकरण करण्यात आले. सुमारे १६० किमी. लांबीचा समुद्रकिनारा, निसर्गरम्य रेडी, शिरोडा, सागरेश्वर, वेळागर, मोचेमाड, बागायत, वायंगणी, कोंडुरा, कालवी बंदर, खवणे, निवती, भोगवे, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला, आचरा, तांबळडेग, मिठबावा, देवगड, विजयदुर्ग इत्यादी समुद्रकिनारे, वेंगुर्ला, मालवण, देवगड बंदरे तसेच वाघोटन, आचरा, कालावल, कोळम, कर्ली, मोचेमाड व आरोंदा या खाड्या याला खलाटपट्टी असे म्हटले जाते.

शेवटचा बदल बुधवार, 10 फ़ेब्रुवारी 2010 20:28 रोजी
 
मालवणी म्हणी पीडीएफ़ छपाई करा ई-मेल
लेखन सना   
शुक्रवार, 01 जानेवारी 2010 10:44

अर्थ पहायला ओळीवर माऊस न्या
आकाडता बापडा, सात माझी कापडा
आयत्यार कोयत्ये
आळशी उटाक आनी शिमरा शिंकाक
इतभर तौसा नी हातभर बी
कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी
कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी
खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच
खांद्यार बसयलो तर कानात मुतता
खुळा भांडता वझरा वांगडा
खेकट्याक मेकटा
गजालीन खाल्लो घोव
गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी?
गावता फुकट भाकरी तर कित्याक करु चाकरी
गावला तेचा फावला

शेवटचा बदल मंगळवार, 26 जानेवारी 2010 21:02 रोजी
 

My Konkan

You need Flash player 6+ and JavaScript enabled to view this video.

लोकमत

माझं प्रिय देवस्थान
 

उपस्थित सदस्य

आहे 6 पाहुणे हजर


feed-image Feed Entries